मुलग्याच्या हव्यासापोटी केले ५ महिन्यांच्या बाळाचे अपहरण .भाईंदर पोलिसांनी २४ तासांत बाळ दिले आईच्या कुशित


मुंबई- कुसूम रोहित यादव (३०), रा समरशेठ बिल्डिंग मधील झोपडी, रेल्वे ह्यूज बिल्डिंगच्या पाठीमागे, भाईंदर पूर्व, ठाणे यांनी समक्ष पोलीस ठाण्यात हजर होऊन दिलेल्या फिर्यादीवरून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३१२/२०१९ भादविसं कलम ३६३, ३६५, ३४ प्रमाणे तक्रार दाखल असून सदर गुन्ह्यांची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे. फिर्यादी कुसूम यादव या मुळच्या उत्तरप्रदेश येथील रहिवाशी असून त्या कामधंद्या निमित्त त्यांचे पती रोहित, मुलगी काजल (४) व मुलगा अभयसिंग (५ महिने) यांचेसह बोईसर जि. पालघर महाराष्ट्र येथे आलेले होते. त्यांचे पती कामानिमित्त मुळगांवी उत्तरप्रदेश येथे निघून गेल्याने फिर्यादी त्यांच्या दोन्ही लहान मुलांच्या उदरनिर्वाहासाठी कामधंद्याच्या शोधात १ महिन्यापूर्वी भाईंदर पूर्व येथे आल्या होत्या. भाईंदर पूर्व रेल्वे स्टेशन नजीक सुरू असलेल्या समरशेठ बिल्डिंगच्या ठिकाणी त्यांची संगिता नावाच्या महिलेशी ओळख झाली. फिर्यादीला उदरनिर्वाहासाठी कामधंदा नसल्याने संगिताने तिच्या दोन्ही मुलांसह कामधंदा मिळेपर्यंत तिचे सोबत राहण्यास सांगितल्यावरुन तिच्या दोन्ही लहान मुलांसह संगिता व तिच्यासोबत असलेला तिचा पति संजू नावाचा इसम संगिताच्या झोपडीमध्ये राहात होती. १७-१२-२०१९ रोजी सकाळी ९ वाजता सुमारास फिर्यादी तिची मुलगी काजल व लहान मुलगा अभयसिंग यांना संगिताकडे ठेवून भाजीमार्केट येथील बफींगचे गाल्या मध्ये कामावर  गेली व त्यानंदर दुपारी २ वाजता कामावरुन पुन्हा घरी येऊन मुलगा अभयसिंग यांस दूध पाजून पुन्हा कामच्या ठिकाणी गेल्या. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता कामावरुन घरी आल्यावर अभयसिंग व संगिता दिसून आले नाहीत म्हणून तिने तिची मुलगी काजल व बांधकामाचे साईडवरील इतर लोकांकडे चौकशी केली असता ४ वाजता संगिता व सोनू यांनी फिर्यादीच्या लहान मुलाचे अपहरण करून पलायन केल्याचे समजले. तिने तत्काळ नवघर पोलीस ठाणे येथे जाऊन तक्रार नमूद केली. तपास करताना संशयीत इसमांचे मोबाईल बाबत तांत्रिक माहिती मिळवून सोनू नावाचे इसमास उमरोली येथून ताब्यात घेऊन यांस विश्वासात घेऊन व सातत्याने विचारपूस करून सोनूचे ताब्यातील मोबाईल मिळून आलेल्या मोबाईल मधील तांत्रिक माहिती प्राप्त करून तात्काळ पथक रवाना करून संगिता नावाच्या महिलेचा काही एक ठावठिकाणा नसताना आरोपी संगिता व अपहृत बालक अभयसिंग उर्फ विजय यांना मु.पो. बोधडी, ता. किनवट, जि. नांदेड येथून ताब्यात घेण्यात आले. सदरची कामगिरी मा. शिवाजी राठोड, पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण संजयकुमार पाटील, नवघर पोलिस स्टेशनचे पोलिस अधीक्षक प्रकाश बिराजदार, अपर पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण, मा. शशिकांत भोसले, भाईंदर विभाग व वरिष्ठ पोलिस संपतराव पाटील, सहा. पो. निरी व सपोनि पोटे हे पुढील गुन्ह्याचा तपास करीत आहेत.