मानवी हक्क आयोगाकडून पोलिसांना २ लाखांचा दंड .हॉटेल व्यवस्थापकास केली होती मारहाण


जळगाव रस्त्यावरील हॉटेल विधाता (किन्होळा) येथे रात्री ११ वाजता पोलिसांनी व्यवस्थापकाकडे दरमहा २ हजारांची खंडणी मागितली. त्याने नकार दिल्याने मारहाण करून त्याच्या विरोधात खोटा गुन्हा नोंदवण्यात आला. पुढे हा प्रकार खोटा असल्याचे सिद्ध झाले. तक्रारकर्त्यान मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली अन् १३ वर्षानंतर तक्रारदाराला पोलिसांनी २ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश आयोगाने दिले. 


औरंगाबाद - जळगाव रस्त्यावरील हॉटेल विधाता | (किन्होळा) येथे रात्री ११ वाजता पोलिसांनी व्यवस्थापकाकडे दरमहा २ हजारांची खंडणी मागितली. त्याने नकार दिल्याने मारहाण करून त्याच्या विरोधात खोटा गुन्हा नोंदवण्यात आला. पुढे हा प्रकार खोटा असल्याचे सिद्ध झाले. तक्रारकर्त्याने मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली अन् १३ वर्षानंतर तक्रारदाराला पोलिसांनी २ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश आयोगाने दिले. त्यानुसार तक्रारदार गनी रमजान पठाण यांना दोन लाख रुपयांचा धनादेश ग्रामीण पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आला. जितेंद्र जैस्वाल यांचे हे हॉटेल आहे. ते वडोदबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. तेथे सुधाकर सुरडकर नावाचे सहायक पोलिस निरीक्षक होते. २४ जानेवारी २००५ ला रात्री पावणेअकरा वाजता ते हॉटेलवर गेले. त्यांनी हॉटेलचालक गनी पठाण यांच्याकडे दरमहा २ हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. गनी यांनी नकार दिल्यानंतर त्यांनी गनी यांना मारहाण केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या मारहाणीत गनी यांच्या कानाला दुखापत झाली होती. त्यांची तक्रार पोलिसांनी घ्यावी यासाठी जैस्वाल व गनी यांनी पोलिस अधीक्षकांपासून ते महासंचालकांपर्यंत सर्वाकडे अर्ज केले. जिल्हाधिकाऱ्यांपासून थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी १२ मे २००५ ला मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली होती. दरम्यानच्या काळात सुरडकर यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळून आले होते. गनी यांच्या कानाला कायमची बधिरता आली. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी करत आयोगासमोर कायम होती. त्यानुसार आयोगाने मार्चमध्ये २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्यानंतर महासंचालकांनी जिल्हा ग्रामीण पोलिसांना पत्र देऊन ही रक्कम तातडीने देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २४ एप्रिलला गनी यांच्या हाती २ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. १३ वर्षानंतर मिळाला न्याय अनेक वेळा पोलिस चुकीचे वागतात. कायद्याचा धाक दाखवून खंडणीही मागतात. या प्रकरणात आम्ही निदीष होतो. पोलिसांनीच मारहाण केली होती. त्यामुळे मागे हटलो नाही. १३ वर्षे संघर्ष केला. अखेर आम्हाला न्याय मिळालाच, असे जितेंद्र जैस्वाल व गनी पठाण यांनी बोलताना सांगितले.