बेकायदा मुंबई- सार्वजनिक | वाहनतळाच्या ५०० मीटरच्या आत गाड्या पार्किंग करणाऱ्यांकडून पाच ते पंधरा हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेला मागे घ्यावा लागण्याची शक्यता आहे. वाहनतळ प्राधिकरणाने दंडाच्या भल्या मोठ्या रकमेबद्दल पालिकेला फटकारल्यानंतर आता दंडाची रक्कम कमी करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे. दंडाची रक्कम नक्की किती असावी हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी ती थेट एक हजार रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
रस्त्यावर कशाही पद्धतीने गाड्या उभ्या करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दंडात्मक कारवाई
बेकायदा पार्किंगचा करण्याचा निर्णय घेतला होता. ७ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. यानुसार सध्या पालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांपासून ५०० मीटरच्या आत रस्त्यावर गाडी उभी केल्यास पाच ते दहा हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. यात दुचाकीसाठी पाच हजार रुपये दंड तर चारचाकीसाठी दहा हजार रुपये दंड करण्यात आला होता. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी ही दंडाची रक्कम खूप जास्त होती. त्यामुळे या निर्णयाला सुरुवातीपासूनच खूप विरोध होत होता.गेल्या कित्येक वर्षांपासून राहत्या इमारतीच्या खालीच रस्त्यावर गाडी उभी करणाऱ्या वाहनचालकांचा या निर्णयाला विरोध होता. तसेच सार्वजनिक वाहनतळावर गाडी उभी करून परत घरापर्यंत चालत येणे पार्किंगचा दंड ज्येष्ठ नागरिकांसाठी गैरसोयीचे असल्याच्याही तक्रारी लोकांकडून येऊ लागल्या होत्या. त्यातच वाहनतळ प्राधिकरणाने पालिकेला या दंडाच्या रकमेवरून फटकारले होते. १० हजार रुपये दंड वसूल करण्याचे पालिकेला अधिकारच नाही. तसेच, गाड्या उचलून नेण्याचेही अधिकार पालिकेला नसल्याचे प्राधिकरणाने म्हटले होते. त्यामुळे पालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे आता दंडाची रक्कम कमी करण्याचा विचार पालिका करीत असल्याची माहिती पालिकेच्या कमी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. मात्र ही रक्कम नक्की किती असावी याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, केवळ मोठ्या रस्त्यावरील दंडाची रक्कम कमी होण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दंडाची रक्कम ठरवण्यासाठी विविध सूत्र तपासून पाहिली जात आहेत. सार्वजनिक वाहनतळावर गाडी उभी करण्यासाठी जे दर पालिकेमार्फत आकारले जातात, त्याच्या साधारण चार ते पाच पट दंडच आकारला जाण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये पार्किंगचे दर ए, बी व सी या तीन प्रकारात घेतले जातात. येथील दर तासासाठी २०, ४० व ६० असे अनुक्रमे आहेत. त्यामुळे चोवीस तासासाठी जास्तीत जास्त २०० रुपये आकारले जातात.