कल्याणमधील मेट्रो मार्गात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागाने इमारत बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. त्या पूर्णपणे नियमब आणि मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने पालिकेला तीन वर्षांपूर्वी पाठविलेल्या पूर्वसूचना पत्राच्या अवमूल्यन करणाऱ्या आहेत. या परवानग्या देणाऱ्या नगररचना विभागातील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा. सुरू असलेली बांधकामे तातडीने थांबवा आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल १५ दिवसांत प्राधिकरणाला पाठवा, असे आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना दिले आहेत. दोन महिन्यांपूर्वी कल्याणमधील मेट्रो मार्गात 'एमएमआरडीए'ने काही सुधारणा केल्या आहेत. तो आराखडा प्राधिकरणाच्या आहत.कल्याणच्या मेट्रो मार्गात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या सुधारित प्रभाव क्षेत्रातील आराखडयानुसार सुधारित इमारत बांधकाम परवानग्या नगररचना विभागाने दिल्या असतील तर त्या तातडीने थांबविण्यात याव्यात, असेही राजीव यांनी पालिकेला कळविले. आहे. आयुक्त राजीव यांच्या पत्रामुळे नगररचना विभागातील बांधकामांना परवानगी देणारे अधिकारी, मेट्रो मार्गिकेत जोमाने गगनचुंबी इमारती उभे करणारे १२ विकासक हादरले आहेत. कल्याणमधील मेट्रो मार्गिकेत नगररचना अधिकाऱ्यांनी इमारत बांधकाम परवानग्या देऊन या मार्गात अडथळे उभे करण्यास सुरुवात केली असल्याचे वृत्त 'लोकसत्ता'ने दिले होते. प्रस्तावित मेट्रो मार्गात पालिकेने नियमबह्य बांधकाम परवानग्या दिल्याच्या तक्रारी माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी, कौस्तुभ गोखले यांनी 'एमएमआरडीए'कडे केल्या आहेत. तक्रारी करूनही मार्गिकेतील बांधकामे थांबविली जात नाही म्हणून कुलकर्णी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे या प्रकरणाची तक्रार केली. हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता गृहीत धरून दोन महिन्यांपूर्वी आयुक्त गोविंद बोडके यांनी नगररचना विभागातील मेट्रो मार्गात बांधकाम परवानग्या देणाऱ्या नऊ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. ठाणे ते भिवंडी मेट्रो मार्गिका, तेथील स्थानके निश्चितीचे काम बांधकामे पूर्ण झाले की प्राधिकरणाचे अधिकारी भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचे काम हाती घेणार आहेत. हे काम सुरू होण्यापूर्वीच आपण सुरू केलेली बांधकामे पूर्ण करू असा विचार करून कल्याणमधील १२ विकासकांनी मेट्रो मार्गातील बांधकामे धडाधड पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. साहाय्यक संचालक नगररचना मारुती राठोड यांनी या सर्व बांधकामांना कामे थांबविण्याच्या नोटिसा देऊनही विकासक नगररचना अधिकाऱ्यांना दाद देत नाहीत. या विकासकांनी आम्ही आमच्या जोखमीवर ही कामे करीत आहोत. आम्ही प्राधिकरणाकडून 'एनओसी' आणू, असे लेखी लिहून दिले आहे. त्यामुळे आम्ही यासंदर्भात काही करू शकत नाही, असे नगररचना अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कल्याणमधील मेट्रो मार्गिकेच्या बाधित क्षेत्रात एकही बांधकाम दिसता कामा नये. असे काही घडले असेल तर परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा आणि १५ दिवसांत कार्यवाही अहवाल एमएमआरडीएला पाठवा, असे पत्र आयुक्त राजीव यांनी पालिकेला पाठवले आहे.
प्राधिकरणाच्या सूचनेकडे दुर्लक्ष
कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला, सहजानंद चौक, शिवाजी चौक ते बाजार समिती असा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गात मेट्रोची स्थानके, सरकता जिना, उद्वाहन या कामांसाठी प्राधिकरणाने जागा निश्चित केली आहे. या मार्गिकेत बांधकाम परवानग्या देऊ नयेत असे प्राधिकरणाने २०१६ मध्ये पालिकेला कळवूनही नगररचना अधिकाऱ्यांनी १२ गगनचुंबी संकुलांना परवानग्या दिल्या आहेत.