मुंबई : ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी बँकांकडून सुरक्षेच्या दृष्टीने सतत काही ना काही उपाययोजना अंमलात आणल्या जातात. मात्र तरीही ग्राहकांना एटीएम, नेट बँकिंग यासह इतर माध्यमातून फसवणुकीचा सामना करावाच लागतो. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी आता नवी व्यवस्था आणली आहे. एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे, जो १ जानेवारी २०२० ओटीपी सुरि पासून लागू होईल. एसबीआयने आपल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी सुविधा आणली आहे. देशभरातील सर्व एटीएममध्ये ही सुविधा लागू होणार आहे. स्टेट बँकेच्या ग्राहकांना १० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ओटीपी टाकावा लागेल, अशी माहिती खुद्द एसबीआयनेच ट्वीट करुन दिली. बँकेत ग्राहकाचा जो नंबर नोंदणीकृत आहे, त्यावर ओटीपी पाठवला जाईल आणि या माध्यमातून पैसे काढता येतील.
१ जानेवारीपासून SBI एटीएमचा हा नियम बदलणार