जव्हार , पालघर , डहाणू , विरार या उपविभागातील पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय व राज्य महामार्ग येतो. या महामार्गावर तसेच काही अंतर्गत रस्त्यांवर वाहन चालकांनी विशेषःत मोटार सायकल चालकांनी निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालविल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. यावर ठोस उपाय योजना करण्याच्या सुचना मा. पोलीस अधीक्षक, पालघर यांनी वेळोवेळी दिल्या होत्या. त्यानुसार वेळोवेळी नाकाबंदी करुन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. परंतु तरी देखील अपघातांचे प्रमाण कमी होत नव्हते याकरीता भरधाव वेगात, व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वाहन चालकांविरुद्ध पोलिसांनी भादविस क्लम २७९, २८३ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ , ३/१८१, १३०(३) | १७७ , १२८ १७७ नुसार कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी बेदकारपणे वाहन चालवणाऱ्या रोड रोमियोंची पोलीसांकडून धरपकड