आश्रय ट्रस्ट सलंग्न सिनिअर सिटीझन सोशल राईट्स फाऊंडेशन संस्थापक श्री. दिपक मोरेश्वर नाईकयांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक१० नोव्हेंबर २०१९ रोजी अंधेरी साईवाडी या परिसरात सिनिअर सिटिझन सोशल राईट्स च्या वतीने ३६ जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला अंधेरी कमिटीच्या अध्यक्ष श्रीमती तुकाबाई चौधर यांच्या तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले. यावेळी साईवाडीतील पंढरीनाथ खंडागळे (निवृत्त पो.अधिकारी) उपस्थित होते तसेच वासुदेव पाष्टे, हरिश्चंद्र रेवाळे, किसन शेवाळे,राजाराम चव्हाण ,दिलीप प्रभु ,काशिराम मांडवकर, शशिकांत बंड हरिश राठोड, महादेव पारदळे , दिपक महाडिक तसेच खास करुन संतोष चौधर यांनी अथक परिश्रम घेतले.
ज्येष्ठ नागरिकाचा सन्मान सोहळा आश्रय ट्रस्टच्या वतीने साईवाडी अंधेरी येथे संपन्न