दिनांक १२/०८/२०२० रोजी राञौ ०३.०० वाजताचे सुमारास कासा पोलीस ठाणे हद्दीतील धानिवरी गांवचे हद्दित मुंबई अहमदाबाद हायवे नं. ८ चे मुंबई वाहीनीवर आरोपी १) कांतीलाल मुंजी मीना वय २७ वर्षे रा. आमजरा पो.ता.बिचीगडा, जि.डोंगरपुरा, राज्य-राजस्थान सध्या- रा. आदित्य ट्रान्सपोर्ट, दाना मंदीर/मस्जीद अंधेरी, मुंबई २) कंटेनर क्रमांक एम.एच.०४ एच.डी. ८९४१ वरील चालक अशोक पुर्ण नाव माहीत नाही. यांनी आपसाति संगनमत करुन यांचे ताब्यातील वाहनात आरोग्यास अपायकारक आहे व त्यावर महाराष्ट्र शासनाने अधिसुचनाद्वारे वाहतुकीस विक्रीस प्रतिबंध केलेला आहे हे माहीती असतांना हि शासकीय आदेशाची अवहेलना करुन घेवुन जात असताना मिळुन आले आहे. आरोपी यांचे ताब्यातुन १) ५, ४९, १२०/-रु किंमतीचे दिलबाग प्लस पान मसालाचे २२ पोते, प्रत्येक पोतेमध्ये ४ गोण्या, प्रत्येक गोणीमध्ये ५२ पॅकेट, प्रत्येकी पॅकेट १२०/- रु. किंमतीचे. २) १,४६, ४३२/- रु. किंमतीचे दिलबाग प्लस चेविंग तंम्बाकु चे २२ पोते प्रत्येक पोतेमध्ये ४ गोण्या, प्रत्येक गोणीमध्ये ५२ पॅकेट, प्रत्येकी पॅकेट ३२/- रु. किंमतीचे ३) ११, ५२,०००/-रु. किंमतीचे ४ के स्टार चे ६४ पोते, प्रत्येक पोतेमध्ये ६ गोण्या, प्रत्येक गोणीमध्ये ५० पॅकेट, प्रत्येकी पॅकेट ६०/- रु. किंमतीचे ४) १३,४७,५५२/-रु. किंमतीचा मोटार कंटेनर क्रमांक एम.एच. ०४ एच.डी. ८९४१ जु.वा.किं.सु. असा एकुण ३१,९५,१०४/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी यांचे विरुद्ध कासा पोलीस ठाणे गु.र.नं. १४३/२०२० भा.दं.वि.सं.कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ सह मोटार वाहन कायदा कलम १२२/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी क्रमांक १ यास दिनांक १२/०८/२०२० रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती, सिध्दवा जायभाये, कासा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
काया पोलीस ठाणे यांचेकडुन तंबाकुजन्य अन्न पदार्थांची वाहतुक करणा-या आरोपीवर कारवाई करुन ३१,९५,१०४/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त